राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रामधून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकामधून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून ठाकरे गटाला कोंडीत आणण्याचा आणखी एक प्रसंग शरद पवारांनी लिहिला आहे.
‘मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो,’ असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, शरद पवारांच्या या कबुलीमुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची चांगलीच कोंडी झाली आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वारंवार जाहीर सभांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये करत असतात. शरद पवारांनी केलेल्या खुलाशानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
हे ही वाचा:
अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची आणखी एक घटना; एक ठार
रशिया झेलेन्स्कीवर हल्ला करण्याच्या तयारीत?
सर्बियात १३ वर्षांच्या मुलाने शाळेत आठ मुलांना घातल्या गोळ्या
‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवासावर देखील भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंकडे राजकीय चातुर्य नाही. उद्धव ठाकरेंना प्रशासकीय अनुभव कमी आहे. ठाकरेंच्या माघारीमुळे मविआ सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात केवळ दोनदा जाणं न पाचणारं होतं. शिवसेनेत उठलेलं वादळ शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं, असे मुद्दे उपस्थित करून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.