दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत

दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात ऑक्सिजन आणि रुग्णालय उभारण्याची मागणी केलीय.

‘राजधानी दिल्लीसाठी शक्य होईल तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले जावेत. त्याचबरोबर डीआरडीओमध्ये ज्या प्रमाणे एका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार अजून काही रुग्णालयांची उभारणी करण्यात यावी’, अशी मागणी सिसोदिया यांनी पत्राद्वारे राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

ऑक्सिजनच्या मुद्द्यावर सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, दिल्लीचा अद्याप गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रविवारी दिल्लीला ४४० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, दिल्लीचा कोटा हा ५९० टन इतका आहे. इतकच नाही तर सध्या दिल्लीतील ऑक्सिजनची मागणी आता ९७६ मेट्रिक टन इतकी बनली असल्याचंही सिसोदिया म्हणाले.

हे ही वाचा:

आरसीबीच्या सिंहावर मास्क

आयपीएलवरही आता कोरोनाचे संकट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

राष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि संबंधित मुद्द्यांवर सोमवारी उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराची मदत मिळावी यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं आहे.

Exit mobile version