दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा

दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवार, १८ मे रोजी आपल्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे बैजल यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

बैजल यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ रोजी संपला होता. मात्र, त्यांना सेवेत मुदतवाढ देण्यात आली होती. ते पाच वर्षे दिल्लीचे नायब राज्यपाल होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे बैजल यांचे नाव अनेकवेळा चर्चेत आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि बैजल यांच्यात हक्कांबाबतही वाद झाला आहे.

बैजल हे १९६९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना दिल्लीचे २१ वे उपराज्यपाल बनवण्यात आले होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय गृहसचिव म्हणून काम केले आहे. त्यांच्या गृहसचिवपदाच्या कार्यकाळातच त्यांनी किरण बेदींवर कारवाई करून त्यांना तुरुंगप्रमुख पदावरून दूर केले होते. त्याच्यावर तुरुंगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपदेखील होता.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

शिवराज सरकारने टिकवले ओबीसी आरक्षण

आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’

अनिल बैजल यांनी अनेक मंत्रालयांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपसचिव म्हणूनही काम केले आहे. २००६ मध्ये ते शहरी विकास मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाले होते. दरम्यान, बैजल आणि आप सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून नेहमीच वाद होत होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला अश्या चर्चादेखील रंगल्या आहेत.

Exit mobile version