नवाब मलिकांवर सात दिवसात गुन्हा दाखल होणार

नवाब मलिकांवर सात दिवसात गुन्हा दाखल होणार

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या न्यायालयाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात पुढील सात दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत एक व्हिडीओ पोस्ट करत हा दावा केला आहे.

मोहित कंबोज व्हिडीओमध्ये म्हणाले की, “समीर वानखेडे यांनी महाराष्ट्रातील मंत्री असलेल्या बिघडलेल्या नवाबांविरोधात केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे एट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार केली होती. त्यानुसार दिल्लीच्या न्यायालयाने मुंबई पोलिसांना पुढील सात दिवसात मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश सोमवारी ३१ जानेवारी रोजी दिले आहेत.

नवाब मलिक यांनी मागील चार महिन्यात वानखेडे कुटुंबाविरोधात अनेक आरोप केले होते. एका मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करत जातीच्या आधारावर भारताच्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम

मुंबई, नागपूरसह दहा नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर? प्रशासक नेमणार?

न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत असल्याचे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. आता मुंबई पोलिस नवाब मलिकांविरोधात कधी गुन्हा दाखल करते हे पाहणार आहोत, असेही मोहित कंबोज म्हणाले. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. आता त्यांना कधी अटक होते याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. जोपर्यंत देशात न्यायालयीन व्यवस्था आहे तोपर्यंत देशातील दीडशे कोटी जनतेचा भारतीय संविधानावर आणि भारतावर विश्वास कायम राहील, असे मोहित कंबोज म्हणाले.

Exit mobile version