काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा!

'आप'शी युती केल्याचे सांगत व्यक्त केली नाराजी

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा!

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केल्यामुळे राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले आहेत. अरविंदर सिंग लवली यांनी आपली नाराजी नोंदवत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

अरविंदर सिंग लवली यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून आपल्या नाराजीचे कारण सांगितले आहे.त्यांनी आपल्या पत्रात लिहिले की, दिल्लीमध्ये ज्या पक्षासोबत काँग्रेस पक्ष विरोधात होता.काँग्रेसने त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

हैदराबादमधील फाइव्ह स्टार हॉटेल मॅरियटवर वक्फ बोर्डाचा दावा; तेलंगणा उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका!

सीबीआयच्या संदेशखालीतील छापेमारीवरून बंगालमध्ये नवीन राजकीय वाद!

ग्वाल्हेरमध्ये लव्ह जिहाद: विवाहित साबीरकडून हिंदू मुलीचे अपहरण!

ज्यू अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा अमेरिकेतील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनाशी संबंध!

काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले.अशा स्थितीतही दिल्ली काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत आघाडी केली आहे. मी या निर्णयाचा सन्मान केला. महासचिवांच्या आदेशाने मी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या रात्री सुभाष चोपडा आणि संदीप दीक्षित यांच्यासोबत घरी देखील गेलो होतो. माझी इच्छा नव्हती तरी मी गेलो होते, असे अरविंदर सिंग लवली म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी हे पत्र जड अंतकरनाने लिहित आहे.मी या पक्षामध्ये स्वत:ला लाचार समजत आहे.मी आता दिल्लीच्या अध्यक्षपदावर राहू शकत नाही, असे अरविंदर सिंग लवली पत्रात म्हणाले.दरम्यान, अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.तसेच अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली काँग्रेस प्रभारी महासचिव दीपक बबरिया यांच्यात वाद सुरु आहे.त्यामुळेच अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version