जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय

प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र

जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बिघाडी वारंवार समोर येताना दिसत आहे. अद्यापही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सातत्याने महाविकास आघाडीत पक्षांवर निशाणा साधत आहेत. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे.

जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे की, “आगामी लोकसभा निवडणूक या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. महाविकास आघाडीने आपापसात जागावाटपाचे समीकरण निश्चित केलेले नाही. आघाडीबाबत सकारात्मक असून जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेना यांच्यात किमान १० जागा आणि काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीत ५ जागांवर समन्वयाचा अभाव आहे,” असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात दिलं आहे.

“निवडणुकीसाठी असलेला कमी कालावधी, काँग्रेस-शिवसेना यांच्यातील असमन्वय आणि महाविकास आघाडीत जागावाटप फॉर्म्युला अंतिम न होणे हे लक्षात घेता ९ मार्च रोजी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली तेव्हा शिवसेना कमीत कमी १८ जागा ज्या भाजपासोबत एकत्रित असताना त्यांनी जिंकल्या होत्या, त्या मागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. चेन्नीथला यांची चिंता समजून मी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्रित बसून ज्या जागा काँग्रेसच्या मनात आणि महाविकास आघाडीत मागणी केल्यात त्या सर्व जागांवर चर्चा करावी असा प्रस्ताव दिला. तेव्हा बाळासाहेब थोरात माझ्याशी संपर्क साधून प्रस्तावावर पुढे चर्चा करतील असं आश्वासन मला देण्यात आले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. लवकरच वरील प्रस्तावावर बाळासाहेब थोरात चर्चेसाठी तारीख आणि वेळ ठरवतील ही मला आशा आहे,” असंही प्रकाश आंबेडकरांनी पत्रात सांगितले आहे. समझोता पुढे नेण्यासाठी हे पत्र होतं. पण अजून उत्तर आल नाही अशी एकंदर परिस्थिती आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संजय राऊत खोटं बोलतात – प्रकाश आंबेडकर

त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही असं खासदार संजय राऊत म्हणतात, पण संजय राऊत खोटं बोलतात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये आपापसात मतभेद असल्यानेच जागावाटप रखडले आहे. त्यामुळे त्यांनी पहिले मतभेद मिटवायला हवेत, असा सल्ला त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

हे ही वाचा..

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

गुंड आणि दहशतवाद्यांच्या संबंध प्रकरणी एनआयएकडून ३० ठिकाणी छापेमारी

पांढरी खानमपूर प्रवेशद्वाराच्या वादाप्रकरणी २५ आंदोलकांवर गुन्हा दाखल

संदेशखाली प्रकरणी सीबीआयच्या चौकशी आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

मोदींची सत्ता घालवणं की पक्ष वाढवणं; काँग्रेसची प्राथमिकता काय? – प्रकाश आंबेडकर

“मोदींची सत्ता घालवणं की पक्ष वाढवणं? काँग्रेसची प्राथमिकता काय आहे?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहतील का? हा मुद्दासुद्धा आहे. आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे, काँग्रेसने त्यांचा इगो बाजूला ठेवावा, असा खोचक सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

Exit mobile version