पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

तृणमलू काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात ममता बॅनर्जी यांचा पराभव हा अटळ आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच बाजी मारेल, अशी कबुली ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांच्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत क्लब हाऊसमध्ये झालेल्या या गुप्त संभाषणाची माहिती बाहेर फुटली असून आता तृणमलू काँग्रेसचा पराभव अटळ आहे, असा दावा भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.

क्लब हाऊस ऍप्पमध्ये तृणमूल काँग्रेसच्या झालेल्या एका बैठकीतील गुप्त संभाषण बाहेर फुटल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. आपले बोलणे इतर लोकांकडून ऐकले जात आहे, ही बाब लक्षात येताच तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक तज्ज्ञाने बोलायचे थांबवले, असे अमित मालवीय यांनी म्हटले आहे.

मालवीय यांच्याकडून ज्या संभाषणाचा दाखला दिला जात आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरणाची भाजपाची चाल यशस्वी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या लोकसंख्येत साधारण २७ टक्के मतदार असलेल्या अनुसूचित जातीचे लोक आणि मतुआ मतदार हे भाजपाला मतदान करतील. काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने गेल्या २० वर्षात मुस्लिमांचे तुष्टीकरण केले, अशी कबुलीही तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक तज्ज्ञाने दिल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

नागपूरमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग

रेशीमबागेत कोरोनाचा शिरकाव…सरसंघचालकांना झाली लागण

देवभूमीत होणार मंदिरमुक्ती

पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली

यापूर्वी ज्याप्रमाणे देशात अनेक ठिकाणी मोदी लाट दिसून आली तशीच लाट पश्चिम बंगालमध्येही आहे. पश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड लोकप्रिय असल्याची माहिती या गुप्त संभाषणात आहे. तसेच १० वर्षे सत्तेत असल्यामुळे तृणमूल काँग्रेसविरोधात अँटी-इन्कम्बन्सी, म्हणजेच प्रस्थापितांविरोधाचे वातावरणही आहे. आक्रमक प्रचारामुळे अनुसूचित जातीची मते भाजपाकडे वळल्याची कबुलीही या संभाषणात देण्यात आली आहे.

Exit mobile version