संजय राऊतांविरुद्ध मानहानीचा खटला

संजय राऊतांविरुद्ध मानहानीचा खटला

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ‘ शिवसेना नेते संजय राऊत यांनी दहशत व भीती निर्माण करण्यासाठी आणि मला बदनाम करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप केले,’असे मेधा सोमय्या म्हणाल्या आहेत. याप्रकरणी राऊतांविरोधात मानहानीचा खटला मेधा सोमय्या यांनी बुधवार, १८ मे रोजी शिवडी न्यायालयात दाखल केला आहे.

संजय राऊतांविरोधात मानहानी खटला दाखल केल्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांनी आमच्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याप्रकरणी आता २६ मे रोजी सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी ही याचिका आम्ही दाखल केली आहे. ठाकरे सरकारकडून आम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी हेही स्पष्ट केले की, जर त्यांना शिवडी न्यायालयात न्याय मिळाला नाही तर ते उच्च न्यायालयात देखील जाणार आहे.

हे ही वाचा:

योगी सरकारचा मोठा निर्णय, मदरशांचे अनुदान बंद

‘पवार’ नावाच्या व्यक्तीची तक्रारच नाही, मग चितळेची चौकशी कशाला?

रशियाचा मोठा विजय, मारियुपोलवर ताबा

संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक

गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांनी सहकुटुंब मुंलुड पोलिस ठाण्यात राऊतांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, संजय राऊत यांच्याविरोधात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र आज मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Exit mobile version