नवाब मलिकांविरुद्ध सव्वा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा

नवाब मलिकांविरुद्ध सव्वा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा

अल्पसंख्याक मंत्री प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा (१.२५) कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

नवाब मलिक यांनी रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन ‘गौप्यस्फोट’ करणे आणि ट्विट करणे सुरुच ठेवले आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अर्शद शेख हे त्यांचे वकील असून सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीला अनुसरून या आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आयोगाने या चारही जणांना पत्र पाठवून जर निर्धारित वेळेत अहवाल प्राप्त झाला नाही तर न्यायालयाचा मार्ग अनुसरण्याचा इशारा दिला आहे. घटनेतील ३३८ कलमानुसार ही बाब न्यायालयात नेली जाईल आणि त्यावेळी या चारजणांना व्यक्तिगत किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या रूपात न्यायालयात हजर राहावे लागेल, असेही पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हे पत्र २६ ऑक्टोबरला समीर वानखेडे यांच्याकडून आयोगाला मिळाले आहे. त्यावर आता या कृती अहवालात तक्रारदाराची माहिती, आरोपीची माहिती, नोंदविलेल्या एफआयआरची माहिती, आरोपींची आणि अटक झालेल्या आरोपींची माहिती, पीडिताला देण्यात आलेल्या नुकसानभरपाईची माहिती नमूद करायची आहे.

Exit mobile version