दीपाली सय्यद यांचा मुख्यमंत्री शिंदेंना पाठींबा

राऊत आणि रश्मी ठाकरेंवर सय्यद यांची टीका

दीपाली सय्यद यांचा मुख्यमंत्री शिंदेंना पाठींबा

दीपाली सय्यद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. यावेळी त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला आहे. शनिवार, १२ नोव्हेंबर रोजी दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याने रश्मी वैहिनींना दुःख झालं, असा गौप्यस्फोट सय्यद यांनी केला आहे.

बुधवार, ९ नोव्हेंबर रोजी दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा निवासस्थानी भेटायला गेल्या होत्या. भेटीपूर्वीचं त्यांनी त्यांचा माध्यमांसमोर निर्णय जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे मला सारखेच आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मला आणलं आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे, असं म्हणत दिपाली सय्यद यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार आहे. हा पक्ष प्रवेश तीन दिवसांवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारायला तयार आहे, असेही सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण?

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ

‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी

दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

यावेळी त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. पक्ष तोंडाने कसा फोडायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. तर मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याने रश्मी वैहिनींना दुःख झालं आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा ताई चिल्लर आहेत, याचा सूत्रधार तर रश्मी वैहिनी आहेत, असा गौप्यस्फोट सय्यद यांनी केला आहे. खोके खोके सरकार जे भाष्य केलं जातं आहे. त्या खोक्यांचं खरं राजकारण लोकांना कळलं पाहिजे, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

Exit mobile version