सहानभूती मिळवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न

सहानभूती मिळवण्याचा ठाकरे गटाचा  प्रयत्न

पोटनिवडणुकीमध्ये लोकांची आपलयाला सहानभूती कशी मिळेल याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहे. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे म्हणून त्यांनी आपले अफेडेव्हीट दिलेच नाही. त्यांच्याकडे जर खरच बहुमत होतं तर त्यांनी ते द्यायला हवं होतं. आम्ही आजही आमच्या भूमिकेवर कायम आहोत.आमची बाजू खरी आहे. आमचा पक्ष अणि चिन्ह आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणार आहोत आमच्याकडे सर्व कागदपत्रे आणि बहुमत आहे, आम्हाला न्याय आणि चिन्हही मिळेल असा विश्वास शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

आजच्या परिस्थितीला ठाकरे गट जबाबदार आहे. आम्ही आयोगाकडे वेळेवेळी कागदपत्र सादर केली. उद्धव गट सातत्याने निवडणूक आयोगाकडे वेळ मागत आहे. कागदपत्रे वेळेवर सादर केली नाहीत. यासाठी आम्हाला जबाबदार धरले जात आहे. हे सहानुभूतीतून केले जात आहे. चिन्ह गोठणार हे उद्धव यांना आधीच माहीत होते. हा सर्व त्यांचा विचारपूर्वक केलेला डाव होता, सहानुभूती मिळवता यावी, म्हणून लगेच निवडणूक आयोगाकडे नवीन निवडणूक चिन्ह सुचवले आहे असाही टोला केसरकर यांनी लगावला.

चिन्ह गोठवल्याचे खरे दु:ख आम्हाला होत आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो. बाळासाहेबांवर आमचं प्रेम म्हणून लढतोय. आमचा लढा हिंदुत्वासाठी आहे. त्यामुळे आम्ही लढत राहू धनुष्यबाण चिन्हावर आमचा अधिकार आहे अशी टीकाही केसरकर यांनी केली आहे .

हे ही वाचा:

धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख

नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक

बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक

शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान

आदित्य ठाकरे जनतेची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जनता हे कधीच मान्य करणार नाही. जनतेला विकास हवा आहे आणि अडीच वर्षांत झालेल्या विकासाचा हिशोब तुम्ही देऊ शकत नाही, अशी टीकाही केसरकर यांनी केली. सत्तेत असलेल्यांना न भेटणे, अपशब्द बोलणे, जनतेशी काहीही न करण्याचे प्रायश्चित जनतेने दिले आहे, अशी टीका केसरकर यांनी केली.

Exit mobile version