गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

दीपक केसरकर यांचे प्रत्युत्तर

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

मुख्यमंत्र्यांना गल्लीगल्लीत निवडणुकीच्या वेळी फिरायला लावणार असे आमदार आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत विधान केले होते त्यावर काल वरळीत येथील सभेत आता शिंदे गटाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काल सात फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली. दोघांनाही निवडणुकीच्या वेळी वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, असं ते म्हणाले होते. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते ‘दीपक केसरकर’ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यावेळेस वरळीतील लोक यांच्याकडे न्याय मागायला गेले होते त्यावेळेस आदित्य ठाकरे त्यांना न्याय देऊ शकले नाहीत म्हणूनच आता कोळी बांधव मुख्यमंत्र्यांकडे आले  आणि मुख्यमंत्र्यांनी पैशांची काळजी न करता कोळी बांधवांना व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल कोळी बांधवांनी मुख्यमंत्रांचा सत्कार केला. त्याला जर गल्लीत फिरणे म्हणत असतील तर आमची त्याला काहीच हरकत नाही, असे प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिले.

वरळीतल्या प्रत्येक गल्लीत मी स्वतः मोटारसायकलने फिरलो आहे. कारण त्या तिथे गाड्या जाऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत आम्ही खास कोळीवाड्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक दुचाकी मंजूर केल्या आहेत. त्यामुळे वयस्कर लोकांना पायी जाण्याऐवजी या दुचाकी वापरता येतील. त्यामुळेच या सर्व वरळीतील गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही. याच गल्लीत राहणाऱ्या कोळी बांधवांचा आम्हाला खूप अभिमान आहे. असेही दीपक केसरकर पुढे म्हणाले.  आदित्य ठाकरे फक्त मतं मिळावी म्हणून कोळी महोत्सवाला जातात. मात्र, याच कोळी बांधवांना कायमस्वरूपी रोजगार आम्ही देतो आहोत. केवळ वरळीला च नाही तर संपूर्ण मुंबई ची सेवा करण्याचे आमचे ध्येय आहे. हि सेवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असताना आदित्य ठाकरे इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करतील याचा खरंच खेद आहे असेही पुढे दीपक केसरकर म्हणाले.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

काय बोलले मुख्यमंत्री
काल कोळी बांधवांनी केलेल्या सत्कार सोहोळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , मुंबई हे केंद्रशासित प्रदेश होणार हा विरोधकांचा जावईशोध कळला. आम्ही गुवाहाटीला जातो, तेव्हा काही लोक म्हणतात यायचे तर वरळी त येऊन दाखवा . बघा एकनाथ शिंदे एकटा आला हेलिकॉप्टरने नाही बाय रोड ने एकटाच आला. आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे. आम्हाला आयते काहीच मिळाले नाही अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली . पुढे शिंदे म्हणाले की, काही लोक सकाळी उठून फक्त गद्दार आणि खोके हे दोनच शब्द बोलतात तिसरा पण शब्द बोलत नाहीत. एकनाथ शिंदे छोटी आव्हाने स्वीकारताच नाही. मोठीच आव्हाने स्वीकारतो आणि तेच आव्हान मी सहा महिन्यांपूर्वीच स्वीकारले. भाजप शिवसेना युती म्हणून लोकानि निवडून दिले पण निकाल लागताच काही लोके म्हणाले , आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत.

२०१९ लाच हे व्हायला हवे होते पण आता त्याची दुरुस्ती आम्ही केल्याचेही पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईकरांना दर पावसाळ्यात खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो आमचे सरकार आल्यानंतर खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. साडेसहा हजार कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्ते सध्या तयार करत आहोत. कोळीवाडा हे मुंबईचे वैभव आहे. कोळी समाज जेवढा प्रेमळ तेवढाच निडर आहे. बराक ओबामा यांनाही कोळी गाण्यावर ठेका धरला होता. याची सुद्धा आठवण मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली. मेट्रो दोन आणि सातचे लोकार्पण झाले. यामध्ये फक्त दहा पंधरा दिवसात २५ लाख लोकांनी प्रवास केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोच्या कामाची सुरवात झाली पण अडीच वर्षात काम ठप्प होऊन काहीच झाले नाही असा तोलासुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

 

Exit mobile version