शिवसेनची शाखा, कार्यालय म्हटले की, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे आलीच. फलकांवरही त्यांची चित्रे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी पक्षाचे इतक्या वर्षांचे संबध ताेडून एकनाथ शिंदे यांच्याबराेबर जात नवीन सरकार स्थापन केले.सत्तांतरानंतर अनेकदा टीका आणि वाद झाले. पण ठाकरे कुटुंबियांबद्दल काही बाेलायचे नाही अशी भूमिका घेतली हाेती. परंतु वाढत्या वादानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गद्दार शब्द बाहेर पडला. तरीही शिंदे गटातील नेते गप्प हाेते. परंतु आता शिवसेनेकडून खालच्या पातळीवरील भाषा वापरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार गणित बदलले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फाेटाे काढून टाकत मनातूनही उतरलात असेच सूचित केले आहे.
केसरकर यांनी आपल्या कार्यालयात फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या फाेटाचे स्थान मात्र कायम ठेवले आहे. परंतु ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फाेटाे काढून टाकले आहेत. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना ही शिंदे गटाने घेतलेली भूमिका अद्याप कायम आहे. त्याचबराेबर बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जपण्यासाठीच आम्ही बंडखाेरीचा निर्णय घेतला असेही शिंदेगटातील आमदार वारंवार सांगताना दिसतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी पुन्हा सूर जुळणे कठीण असल्याचे संकेतच फाेटाे काढण्यातून देण्यात आले आहेत.
केसरकर यांनी सत्तांतरानंतर तब्बल चार महिन्यांनी आपल्या कार्यालयात हा बदल घडवून आणला आहे. परंतु या अगाेदर औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनीही आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फाेटाे हटवला हाेता. माझ्या कार्यालयात नेहमी एकच फाेटाे असताे. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून आम्ही त्यांच्याबराेबर काम करत आहाेत त्यामुळे त्यांचा फाेटाे माझ्या कार्यालयात असणं आवश्यक असल्याचं विधान शिरसाट यांनी केलं हाेतं.
हे ही वाचा:
दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला
अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क
७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
ठाकरे कुटुंबयांबद्दल नाही पण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आमदारांच्या मनात कायम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच आता या आमदारांच्या कार्यालयाच्या भिंतींनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फाेटाेंनी जागा घेत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.