दीपक केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबाेल
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला हाेता. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबाेल केला आहे. खासदारांच्या घरावर माेर्चे काढता. घरावर माेर्चा काढण्याचा अधिकार काेणी दिला ? लाेकांना का भडकावता असा थेट प्रश्नच केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विचारला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या आदराखातर त्यांच्याबद्दल आम्ही काहीही बाेलणार नाही व टीका करणार नाही असे शिंदे गटाच्या आमदारांनी स्पष्ट केले हाेते. आता मात्र या आमदारांनीही आपापल्या भात्यातून टीकेचे बाण मारण्यास सुरुवात केली आहे.
खासदारांच्या घरावर माेर्चा काढण्याच्या घटनेबद्दल बाेलताना प्रवक्ते केसरकर पुढे म्हणाले की, आजारी असताना कटकारस्थान झाले नाही. आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली म्हणजे कटकारस्थान नाही. कालपर्यंत न फिरणारे आता फिरायला लागले आहेत. पण सातव्या मजल्यावरील ऑफिसात कितीवेळा गेलात? व काय काम केलेत? असा खाेचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केसरकर यांनी बांधावर जा म्हणून सांगायचे, मग आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा प्रश्नही यावेळी केला.
हे ही वाचा:
पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी
“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”
मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
टीकेच्या धाेरणामुळे केंद्राशी संबंध चांगले राहिले नाहीत
केंद्राशी चांगले संबंध राहिले असते तर विकासाला चालना मिळाली असती. पण रोज सकाळी ९ वाजता उठायचे आणि केंद्रावर टीका करायची हेच धोरण राबवलं गेलं. त्यामुळे केंद्राशी संबंध चांगले राहिले नाहीत, अशी टीका करतानाच गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होतं. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबलं पाहिजे, असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं.