खलिस्तानचा झेंडा फडकवणा-याची ओळख पटली

खलिस्तानचा झेंडा फडकवणा-याची ओळख पटली

भारताच्या ७२ च्या प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर शिखांचा झेंडा फटकवणा-यांच्या म्होरक्याची ओळख उघड आली असून दिप सिद्धू असे त्याचे नाव आहे. हा इसम भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा दावा काँग्रेस आणि डावे पक्ष करीत होते, परंतु प्रत्यक्षात हा दावा खोडसाळ असल्याचे उघड झाले. यानिमित्ताने मोदी सरकारवर चिखलफेक करण्याची खेळी पुन्हा एकदा फसली आहे.

प्रजासत्ताक दिनाला लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा फेकून देत  ‘खलिस्तानी झेंडा’ फडकवला.

भारतीय किसान युनियनचे नेते बूटा सिंग बुर्गजेल यांनी ‘द प्रिंट’ला दिलेल्या माहितीनुसार, “दीप सिद्धू आणि त्याचे गुंड यांनीच लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. ते सुरुवातीपासूनच आंदोलनात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आम्ही नियोजित मार्गावरच ट्रॅक्टर रॅली काढत आहोत.”

 

परंतु समाज माध्यमांमधून काही राजकीय कार्यकर्ते आणि ‘विश्लेषकांकडून’ असा प्रचार सुरू झाला कि सिद्धू हा भाजपा समर्थक आहे. गृहमंत्री अमित शहां यांनीच हे सगळं नियोजन केले होते, अशा प्रकारचे ट्विट करायला सुरवात केली.

परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपा आणि भाजपचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी ६ डिसेंबर २०२० रोजीच त्यांचा आणि सिद्धूचा काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले होते.

याउलट काँग्रेस पक्षाने त्यांचा व्हिडिओ देखील आंदोलनादरम्यान ‘क्रांतिकारक’ म्हणून प्रसिद्ध केला होता. शिवाय बरखा दत्त यांना दिलेल्या इंटरव्ह्यूवमध्ये स्वतः सिद्धूनेही सांगितले होते की, “माझा आणि भाजपचा काहीही संबंध नाही.”

या सर्व प्रकारानंतर भाजपा सरकार आणि पर्यायाने मोदींविरुद्ध सुरु असलेल्या विरोधी पक्षांच्या दुष्प्रचाराचा भांडाफोड झाला आहे.

Exit mobile version