लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक

लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. दीप सिद्धू यानेच त्याच्या काही गुंडांसमवेत लाल किल्ल्यावर जाऊन तिरंग्याच्या जागी खलिस्तानी झेंडा फडकावला होता.

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली होती. बूटा सिंह, जजबीर सिंह, सुखदेव सिंह आणि इकबाल सिंह यांच्यावर प्रत्येकी 50 हजारांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. तर दीप सिद्धूसह जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह यांच्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते.

२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी (स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम) म्हणजेच मुख्य तपस यंत्रणा स्थापन करण्यात आली होती. जॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तपास करत आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. यात भीष्म सिंह, जॉय टिर्की आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश आहे.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेत ३९४ पोलीस जखमी झाले होते. त्यात पोलिसांच्या ३० गाड्यांचे नुकसान झाले होते. दिल्ली पोलिसांनी या हिंसेत गंभीर जखमी झालेल्या पोलिसांना प्रत्येकी २५-२५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. तर इतर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती.

Exit mobile version