मायावतींना व्हायचे आहे आता पंतप्रधान !

बसपा खासदाराने घातली अट तरच इंडी आघाडीत सहभागी होऊ

मायावतींना व्हायचे आहे आता पंतप्रधान !

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत कारण्यासाठी विरोधकांनी इंडी आघाडीची स्थापना केली. मात्र,बहुजन समाजवादी पार्टीने अद्याप इंडी आघाडीत प्रवेश केलेला नाही.परंतु बसपाच्या खासदाराने एक वेगळीच अट घातली आहे.ती म्हणजे जर मायावती यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यास तर बसपा इंडी आघाडीयामध्ये सामील होण्याचा विचार करेल.

इंडी आघाडीच्या पक्षात अस्थिरता असल्याचे चित्र दिसत आहे.कारण आगामी काळातील लोकसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडीला यश मिळाल्यास पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावर कोणाकडूनही रीतसर स्पष्टीकरण आलेले नाही.मात्र, मागील काही दिवसांपूर्वी इंडी आघाडीची बैठक पार पडली.या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारपदी काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाला पसंती दिली.मात्र, इंडी आघाडीतील काही नेत्यांनी खर्गे यांच्या नावाला पसंती दर्शवली तर काहीनी बोलणे टाळले.

त्यानंतर जेडी(यू) पक्षाच्या काही नेत्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नितीश कुमार यांचे नाव घोषित करण्याची मागणी केली.आता अशीच मागणी बसपाच्या खासदाराने केली आहे तेही अट घालून.जर मायावती यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यास तर बसपा इंडी आघाडीयामध्ये सामील होण्याचा करेल,असे बसपा खासदार मलूक नागर यांनी म्हटले आहे.दरम्यान, इंडी आघाडीत बसपा सामील होईल अशा बातम्या समोर येत होत्या,परंतु मायावती यांनी या अफवा फेटाळून लावल्या.

हे ही वाचा:

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!

करणी सेना प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोजर!

ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!

दहशतवादी हाफिज सईदला आमच्या स्वाधीन करा!

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडलेल्या काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाच्या संदर्भात बोलताना नागर म्हणाले, “आमचे काही आमदार काढून घेतल्याबद्दल काँग्रेसने मायावतीजींची माफी मागितली पाहिजे आणि त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले पाहिजे. तसेच २०२४ मध्ये बहुजन समाजवादी पक्षच भाजपला रोखू शकेल.

“काँग्रेसला पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा हवा असेल तर मायावती यांच्यापेक्षा कोणीही चांगले असू शकत नाही,” ते म्हणाले, “काँग्रेसने आमच्या अटी मान्य केल्यास मायावती जी नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करतील.मायावतींना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यास आम्ही ६० पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो,” असे नागर म्हणाले.

 

Exit mobile version