“गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत घेतले”

केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गौरवोद्गार

“गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत घेतले”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गौरवोद्गार काढले आहेत. गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी गेल्या १० वर्षांत घेतले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला मिळालेल्या अपयशाबद्दलही त्यांनी वक्तव्य केले आहे.

“गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदींनी काम केलं आहे. त्यांचे १० वर्षांतले काम आणि घेतलेल निर्णय सर्वांनी पाहिले आहेत. गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते त्यांनी गेल्या १० वर्षांत घेतले. परंतु, नरेटिव्ह सेट करताना काही ठिकाणी आम्हाला नुकसान झालं. महाराष्ट्रातही नुकसान झालं. संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा चर्चा होत्या. असं काहीच होणार नव्हतं. परंतु, ४०० पारच्या आकड्यामुळे गडबड झाली,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्ट वापरून मतदान, चार बांगलादेशींना अटक!

बुधवारी चंद्राबाबू नायडू घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

मोदींच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण नाही? मुनगंटीवार म्हणाले…

केजरीवाल, आम्हाला आमचे हजार रुपये द्या… महिलांनी दिल्ली सरकारला घेरलं

“नरेंद्र मोदींना देशाची सेवा करायची आहे. मोदींनी आपलं जीवन देशाला समर्पित केलं आहे. १० वर्षांत एकही सुट्टी न घेतलेला पंतप्रधान कोण आहे? तर त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यंदा पंतप्रधान बनले. आम्ही जुने सहकारी आहोत. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी सर्वातं पहिला निर्णय शेतकऱ्यांविषयी घेतला. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणीही सुखी राहू शकत नाही,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. “शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात. पीकविमाही सरकार भरतं. एक रुपया देऊन पीकविमा लागू करतो. अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत. राज्यातील शेतकरी दुःखी नसावा म्हणून प्रयत्न करत आहोत,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version