मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला टोला
निर्णय कुठेही थांबलेले नाहीत. मंत्रिमंडळ काय, लवकरच होईल. त्यात अडचण काहीच नाहीये. विरोधी पक्षनेत्याला विरोध करायचाच असतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला. राज्यातील मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झाला नसल्यावरून नेमका मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी हा टोला लगावला आहे.
शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्यावर शिक्कामोर्तब केल्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला. पण त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावरून विरोधक निशाणा साधण्याची संधी साधत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावरुन सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. पालकमंत्रीही लवकरच जाहीर केले जातील, असे स्पष्ट केले पण त्याचवेळी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असेही स्पष्ट केले.
हे ही वाचा:
असंसदीय शब्दानंतर आता उपोषण, धरणेवरून विरोधकांचे रडणे!
‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन
महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण
अजित पवारांना पराभव समोर दिसतोय
विस्तार कधीपर्यंत होणार, याची काही डेडलाईन असणार आहे का? असा टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. डेड लाईन संदर्भात अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी पत्रकार परिषदेत विचारले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या विरोधकांची लाईन डेड झाली आहे म्हणून ते डेडलाईन मागतायत, असं त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.