झारखंड सरकारने दारूची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला आणि झारखंड सरकारला भारतीय जनता पक्षाने चांगलेच धारेवर धरले आहे. झारखंड सरकारने कोरोना काळात जनतेची फसवणूक केली, असे भाजपने म्हटले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दीपक प्रकाश यांनी झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारच्या दारूची होम डिलिव्हरी करण्याच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, ” कोरोनाच्या काळात औषध वाटप करण्याऐवजी दारू घरपोच देण्याचा हेमंत सरकारचा निर्णय लोकविरोधी आहे. औषधाऐवजी लोकांना दारू पाजण्यावर सरकार उतावीळ झाले आहे. सरकार औषध पुरवठयापेक्षा दारूला प्राधान्य देत आहे. प्रत्येक गावात वीज, पाणी, मुलांना पुस्तके, रस्ते अशा आवश्यक गरजा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गरिबांना अन्न, आजाराला औषध, शेतकऱ्याला बियाणे देण्याऐवजी लोकांना दारू पाजण्याचा त्यांचा निर्धार आहे. अशा सरकारचा राज्य आणि राज्यातील जनतेला कधीच फायदा होऊ शकत नाही.
त्यावर झारखंड सरकारने महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. मात्र, महसूल वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत, सरकारच्या नेतृत्वशून्यतेमुळे महसूल वाढवण्यासाठी हेमंत सरकारने दारूचा अवलंब केला आहे. दारूच्या होम डिलिव्हरीमुळे समाजातील वातावरण बिघडते.आतापर्यंत सरकारने कधी औषध वितरणासाठी ऍप बनवले नाही, मात्र दारूच्या होमी डिलिव्हरीसाठी ऍप सुरु करणार आहे. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
हे ही वाचा:
संगीत रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचे निधन
मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी
प्रजासत्ताक संचलनात आदिवासी चित्रकलेचे दर्शन
संगीत रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचे निधन
राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात सरकार अपयशी
खासदार दीपक प्रकाश म्हणाले की, हेमंत सरकार निर्णय घेण्यास आणि राज्य सुरळीत चालवण्यात पूर्णपणे अक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचवेळी त्यांनी शिक्षणमंत्री जगनाथ महतो यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये त्यांनी डीव्हीसीला कोळशाचे पाणी बंद करण्यास सांगितले आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा भाषेची अपेक्षा करता येणार नाही,असे ते म्हणाले.