लवकरच देशात लोकसभा निवडणूकींची घोषणा होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नसून पहिल्या यादीत १६ राज्यांमधील आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील १९५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांनी ही यादी घोषित केली आहे. केंद्रीय निवडणूक समितीची बैठक २९ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ लोकसभा निवडणूक वाराणसीतून येथून लढणार आहेत. त्यांना तिसऱ्यांदा या मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर, अमित शाह यांनी गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ते दुसऱ्यांदा येथून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अंदमान निकोबारमधून विष्णू पडारे, अरुणाचल प्रदेश वेस्टमधून किरण रिजीजू, अरुणाचल ईस्टमधून तापीर गांवता निवडणूक लढणार आहेत. पहिल्या यादीत १९५ पैकी २८ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर ३४ मंत्र्यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्री यांची नावे देखील १९५ उमेदवारांमध्ये आहेत. तसेच ५० पेक्षा कमी वय असलेले ४७ युवा उमेदवार असणार आहेत. अनुसूचित जाती २७, अनुसूचित जमाती १८, ओबीसी ५७ अशा सर्व वर्गांचे प्रतिनीधीत्व पहिल्या यादीत देण्यात आल्याचे देखील यावेळी भाजपकडून सांगण्यात आलं.
हे ही वाचा:
वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर
४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!
बारामतीमधील महा रोजगार मेळाव्याच्या मंचावर रंगला टाळाटाळीचा खेळ
केसीआरला धक्का! दोन दिवसात दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!
भाजपाच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची संख्या
उत्तर प्रदेश ५१, पश्चिम बंगाल २६, मध्य प्रदेश २४, गुजरात १५, राजस्थान १५, केरळ १२, तेलंगाना ९, आसाम १४, झारखंड ११, छत्तीसगड ११, दिल्ली ५, जम्मू- काश्मीर २, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश २, गोवा १, त्रिपुरा १, अंदमान आणि निकोबार १.