स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वराच्या वतीने वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशिदी खटल्याबाबत याचिका दाखल करणाऱ्या हरिहर पांडे यांना धमकीचे फोन करण्यात आले. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व खात्याला (एएसआय) या मंदिराचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून तिथे मंदिर होते का याची चाचपणी करण्याचे आदेश दिल्यानंतर हा धमकीचा फोन करण्यात आला होता.
पोलिसांनी त्यांना तात्काळ सुरक्षा म्हणून दोन हवालदारांची पांडे याच्या निवासस्थानी नियुक्ती केली आहे.
हे ही वाचा:
लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह
पश्चिम बंगालमधून स्फोटक साहित्य जप्त
‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’
भारतात येऊ शकतात पाच नव्या लसी
ज्यादिवशी न्यायालयाने निर्णय दिला त्याच दिवशी पांडे यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. या फोनमधून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पांडे यांनी तात्काळ पोलिसांची संपर्क केला. या धोक्याबद्दल कळल्यानंतर तात्काळ एसीपी अवदेश पांडे यांनी हरिहर पांडे यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. एसीपी अवदेश पांडे यांनी अनोळखी क्रमांक ट्रेस केला जात असून तपासकार्याला सुरूवात केली असल्याचे सांगितले.
हरिहर पांडे, पंडित सोमनाथ व्यास आणि रामरंग शर्मा या तिघांनी सर्वात प्रथम स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वराच्या वतीने १९९१ मध्ये दिवाणी न्यायलयात याचिका दाखल केली होती. या तिघांपैकी सध्या फक्त हरिहर पांडे हेच जिवंत आहेत.
डिसेंबर २०१९ मध्ये संपूर्ण ज्ञानवापी मशिदीचे एएसआयकडून सर्वेक्षण व्हावे यासाठी पुढील मित्र या नात्याने स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वराच्या वतीने ऍडव्होकेट विजय शंकर रस्तोगी यांनी याचिका दाखल केली होती.
याबाबत फास्ट ट्रॅक न्यायालयाने निर्णय देताना पुरात्त्व खात्याला या संपूर्ण मशिदीच्या परिसराचेच सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्याबरोबरच यासाठी पाच सदस्यीय समिती बनविण्याची आज्ञा देखील दिली. यात दोन मुसलमान सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.