भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे धक्कदायक वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना अज्ञात व्याक्तीकडून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांनी यासंबंधीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांना ही धमकी दोन वेगवेगळ्या फोनवरून देण्यात आली असून यासंदर्भात आशिष शेलार यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाईल नंबरची माहिती मुंबई पोलिसांना देऊन याबाबत तपास करण्याची त्यांनी विनंती केली आहे. तसेच या संदर्भात शनिवार ८ डिसेंबर रोजी ते गृहमंत्र्यांनाही पत्र लिहिणार असल्याचे वृत्त आहे.
आशिष शेलार हे सरकारविरुद्ध भूमिका मांडत असतात. आशिष शेलार हे संघर्ष करत आहेत म्हणूनच त्यांना धमकी आली असावी अंदाज विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले
झुलन गोस्वामीच्या मुख्य भूमिकेत विराटची बायको!
भारतीयांना लवकरच ई-पासपोर्टची सेवा
आतंकवाद्यांच्या निशाण्यावर रेशीमबाग
आमदार आशिष शेलार यांना २०२० सालीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा त्यांना नऊ वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकी देण्यात आली होती. मात्र, धमकी देणारी व्यक्ती एकच होती, असे तपासातून समोर आले होते. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी ठाण्यातील मुंब्रा येथील दोघांना ताब्यात घेतले होते.