आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचार सुरू असलेल्या एमडीएमके खासदाराचा मृत्यू

खासदार गणेशमूर्ती लोकसभा तिकीट नाकारल्याने होते नाराज

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचार सुरू असलेल्या एमडीएमके खासदाराचा मृत्यू

तामिळनाडू येथील इरोडे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गणेशमूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी आत्म्हत्येचा प्रयत्न केला होता. कथित आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अशातच गणेशमूर्ती यांचा गुरुवार, २८ मार्च रोजी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे.

इरोडे एमडीएमकेचे खासदार गणेशमूर्ती यांनी कथित आत्महत्येचा रविवारी प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अशातच खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

गणेशमूर्ती हे २०१९ मध्ये इरोडे या मतदारसंघामधून निवडून आले होते. मात्र, यंदा त्यांना पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे ते निराश होते, अशी चर्चा आहे. त्यांनी रविवारी कथित आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एमडीएमकेच्या हायकंमाडनं तिकीट नाकारल्यानंतर इरोडचे खासदार गणेशमूर्ती हे तणावात होते. मात्र, उपचार सुरू असतानाच खासदार गणेशमूर्ती यांचे निधन झाल्यानं राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे.

हे ही वाचा:

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

गणेशमूर्ती हे तीन वेळा खासदार राहिलेले होते. काम करूनही पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्याने गणेशमूर्ती नाराज झाले होते. त्यांनी एमडीएमकेमध्ये महत्त्वाची पदे भूषवली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत इरोड मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने ते संतापले होते. द्रमुकने इरोडमध्ये आपला उमेदवार उभा केला असून तिरुचीची जागा एमडीएमकेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version