पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाशी झुंज देत होते,आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.
लक्ष्मण जगताप एकूण तीन वेळा र्पिपरी-चिंचवडचे आमादार राहिले होते. काही दिवंसांपूर्वी त्यांनी या आजारावर मात केली होती असे बोलले जाते.
आमदार लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द
पिंपरी-चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांनी आपली राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर, जगताप यांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
2014 पर्यंत अजित पवार यांचे विश्वासू आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप मनसे पाठिंब्यावर निवडणूक त्यांनी लढव ली पण पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून उमेदवारी मिळवत त्यांनी विजय मिळवला. 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी पालिकेत भाजपला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा:
‘वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे’
छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग
‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे
जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा परिषदेच्या निवडणूकीच्या वेळेस लक्ष्मण जगताप यांचे एक मतही बहुमोल ठरले होते, आजारी असतानांही त्यांनी रुग्णवाहिकेमधून येऊन मतदान केले होते. यावरून त्यांची पक्षाबद्दल असलेली निष्ठा सगळ्यांनीच बघितली, यासाठी उपमुख्यमंत्र्यानी सुद्धा त्यांचे आणि मुक्ता टिळक यांचे आभार मानले होते. २२ डिसेंबरला कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन आणि आज ३ जानेवारीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने भाजपने आपले दोन नेते गमावल्याची खंत व्यक्त होत आहे.