26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाडोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

Google News Follow

Related

कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचा वाद विकोपाला पोहचला आहे. त्यातच डोंबिवली पश्चिम येथील भाजपा कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर आज हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी ही घटना घडली असून, यामुळे भाजपाच्या गोटात संतापाचे वातावरण आहे. मनोज कटके यांच्या डोळ्यात अज्ञात व्यक्तीने मिरचीपूड टाकून त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यांच्यावर आता शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णालयात जमा झाले. आमदार चव्हाण यांनी कटके यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे. आता कटके यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

भाजपाचे कार्यकर्ते मनोज कटके हे त्यांच्या स्पेअर पार्ट्सच्या दुकानात असताना चारचाकीमधून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण करून जखमी केले. कटके यांच्यावर कोणी आणि का हल्ला केला हे समजू शकलेले नाही, मात्र हल्लेखोरांनी वापरलेले वाहन सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे पोलिसांना हल्लेखोरापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी

युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री

सेबीच्या अध्यक्षपदी माधबी पुरी बुच

रशिया-युक्रेन युद्धात बेलारुसची भूमिका काय?

याबाबत आमदार चव्हाण म्हणाले की, ” पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा भाजपा आंदोलन करेल. भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.” कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी, ” हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा