24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणजनतेचा कौल चोरून केलेलं सरकार चालत नसतं, जनतेचे सरकार आज आले आहे!

जनतेचा कौल चोरून केलेलं सरकार चालत नसतं, जनतेचे सरकार आज आले आहे!

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले उद्गार

त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. नंबर गेम फसतो की नाही याकडे लक्ष होतं. शेवटी तिघांचा नंबर गेम झाला. होता. म्हणूनच निकाल येण्याआधीच सगळे मार्ग खुले आहेत असे उद्धव म्हणत होते. त्यामुळे उद्धव यांनी आपल्याशी चर्चाच केली नाही. मी फोन करत होतो, पण फोन घेत नव्हते. कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची फारकत झाली. आज त्यांच्या पक्षावर आली त्याचे बीजारोपण त्या घटनेत होते. मँडेट चोरून केलेलं सरकार चालत नसतं. जनतेचे सरकार आज निवडून आले. या सरकारने राजरोसपणे युती करून वोट मागितले होते. आम्ही १०६ आणि ४० यांनी एकत्र मते मागितली होती. ते नैसर्गिक सरकार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड येथील भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की, पन्नास आमदार ज्यामध्ये नऊ मंत्रीसुद्धा होते. जे सरकार सोडून विरोधी पक्षात आले. उठाव केलेल्या आमदारांच्या लक्षात आलं जर राज्यात असंच चाललं तर पुढच्या निवडणुकीत आपण दिसणारच नाही. यासाठी फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना फडणवीस म्हणाले, एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. ते बाहेर पडले तेव्हा ठरलं नव्हतं की सरकार येईलच. असं घडलं नसतं तर त्यांचं सामाजिक, राजकीय जीवन समाप्त करण्यात आलं असतं, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. त्यांनी ठरवलं, बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणं गरजेचं आहे. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही विचारांसाठी झालं आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्यापेक्षा राजकारण सोडेन. त्यांच्यासोबत यांनी सरकार स्थापन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज जिथे अपमान होतो त्यांच्यासोबत यांनी सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्ष नाही तर तो विचार आहे आणि हा विचार एकनाथ शिंदे यांनी जिवंत ठेवला आहे. यावेळी फडणवीसांनी सरकार स्थापन झाल्यापासून २४ दिवसांत किती कामे केली हेही सांगितलं आहे. तसेच फडणवीसांनी दोन सरकार मधील फरक सुद्धा सांगितला आहे. ते म्हणाले, पूर्वी राज्यात फक्त लेना बँक होती. आता राज्यात देना बँक आली आहे. मविआ सरकार हे डिफेक्टिव्ह सरकार होतं. पण आताच सरकार सुपरऍक्टिव्ह आहे. अडीच वर्षातील बॅकलॉग दीड वर्षात भरून काढायचा आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत

विधान परिषदेचे १२ आमदार आहेत. या आमदारांकरिता २०० लोक याच सभागृहात आहेत. जे नियमात असेल राज्यपालांचे समाधान झाले पाहिजे याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. काही जागा शिवसेनेला द्यायला लागतील. प्रत्येकाला संधी देता येणार नाही. संघर्षाच्या काळात एक होतो. संघर्ष न करता समाजाशी काम करायचे त्यावेळी एकजूट महत्त्वाची आहे. मोठ्या लक्ष्याकरिता काम केले पाहिजे. केवळ सत्ता मिळविण्यासाठी आपण आलेलो नाही, असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

योगी सरकारचा दिलासा; ग्रेटर नोएडामध्ये वीज दर १० टक्क्यांनी कमी

शिवसेना कुणाची? कागदोपत्री पुरावे सादर करा!

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

अडीच वर्षात राज्यात विकासाची, प्रगतीची गती कमी झाली होती. यासाठी राज्यात परिवर्तन होणं गरजेचं होत. सध्या राज्यात झालेलं परिवर्तन हे खुर्चीसाठी, सत्तेसाठी नाही तर राज्याच्या विकासासाठी,जनतेसाठी झालं आहे. यासाठी मागील अडीच वर्ष आम्ही लढा दिला असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. सत्तेला चुंबकाचं उदाहरण देत फडणवीस म्हणाले, सत्ता एक चुंबक असत जे लोकांना एकत्र ठेवते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा