गुजरात विधानसभा २०२२ चा निकाल जाहीर होत असून, गुजरातमध्ये भाजपा सातव्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी भाजपाचे अभिनंदन केले आहे. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा अभिनंदन करत भाजपावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंकडे टोमणे अस्त्र असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार तसेच अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याजवळ एक अस्त्र आहे जे ब्रह्मास्त्र पेक्षाही प्रभावी आहे, ते म्हणजे टोमणे अस्त्र. टोमणे मारल्याशिवाय त्यांची वाक्य पूर्ण होतं नाहीत. तसेच अखेर उद्धवजींना उद्योगांचं महत्व कळले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प घालवणारे हे उद्धव ठाकरेचं आहेत. रिफायनरी सारखा देशातील सर्वात मोठा प्रकल्प त्यांनी बाहेर घालवला आहे, असा गंभीर आरोप फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
कधीतरी विजय मिळाल्यानंतर विरोधकांचे तोंड भरून कौतुक करायचे. पण उद्धव ठाकरे अजून त्या मानसिकतेपर्यंत पोहचले नाही. महाराष्ट्रात जे काय घडलं त्याचा परिणाम अजूनही त्यांच्या मनावर आहे, अशी टीकाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हे ही वाचा :
मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले
प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांना मातृशोक
तामिळनाडूवर घोंघावतय मांडूस चक्रीवादळ
शिंदे-फडणवीस सरकराने कर्नाटक बँकांकडे खाती दिली, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यांसह उत्तर दिले आहे. ते म्हणाले, दादांनी जर माहिती घेतली असती तर त्यांनी हे वक्तव्य केलं नसते. ज्यावेळी दादा मंत्री होते त्यावेळी कर्नाटक बँकेची खाती आणि व्यवसाय देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकराने घेतला आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार अर्थमंत्री असताना निर्णय घेण्यात आले आहेत. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची तारखांसह माहिती दिली आहे.