‘खात कुठलं महत्वाचं नाही, तर खात चालवणारा व्यक्ती योग्य पाहिजे’

‘खात कुठलं महत्वाचं नाही, तर खात चालवणारा व्यक्ती योग्य पाहिजे’

अखेर शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. खातेवाटप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. कोणत्या मंत्र्याला कोणतं खात मिळालं यापेक्षा खातं चालवणारा व्यक्ती योग्य असावा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात होत. ते खात त्यांच्याकडे आताही कायम राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खात्याची जबाबदारी आहे.
आमच्या मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार झाला असल्याने मंत्र्यांवर अधिक भर टाकण्यात आला आहे. पुढील विस्तार केल्यावर अधिकचे खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. या परिस्थितीत मिळालेल्या खात्याला योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. खात कुठले मिळाले आहे हे महत्वाचे नाही. तर खात चालवणारा व्यक्ती योग्य असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच खातेवाटपावरून आमच्यात कोणताही वाद नसल्याचेही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

इजिप्तमध्ये चर्चला लागलेल्या आगीत ४१ जण होरपळले

एकनाथ शिंदेंकडे नगरविकास तर फडणवीसांकडे अर्थ व गृह

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जून रोजी घेतली होती. यासोबतच शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे फडणवीस सरकारचा ३९ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप रखडले होते. अखेर मंत्रिमंडळात खातेवाटप झाले आहे.

Exit mobile version