सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन

सायन येथील भाजप स्थापना दिन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मार्गदर्शन

सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन

आपण सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन आहे. ज्याचा उपयोग करुन सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करायचे आहे. सामाजिक, आर्थिक लढाईतील एक परिवर्तन म्हणून आपण सत्तेकडे पाहतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशभरात गुरुवारी भाजपचा ४३ व स्थापना दिवस जोरदार साजरा करण्यात आला. सायन यथे भाजपाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या वर्धापनानिमित्त मुंबईमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायन येथे आयोपजित कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, जे शक्य नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांनी आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं. आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन आहे. ज्याचा उपयोग करून आपल्याला सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवायचे आहे. या लढाईतील एक उपकरण म्हणून आपल्याला सत्तेकडे बघितलं पाहिजे.

भारतीय जनता पक्ष देशाच्या सगळ्या भागांमध्ये पोहचला आहे. नॉर्थ ईस्ट सारख्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार तयार झालेली आहेत. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा मोदीजी यांच्यावर विश्वास आहे. हा विश्वास तयार झाला आहे, कारण गेली ९ वर्षे एक नेता घर संसार सोडून २४ तास भारताचा विचार करतो. करोनासारख्या महामारीत जगात लोक भुकेने मरत होती. पण, भारतात एकही व्यक्तीला भुकेने मरू दिला नाही. सर्वापर्यंत अन्न पोहचवणारे पंतप्रधान मोदी होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

कलम ३७० हटल्यानंतर जम्मू काश्मीरच्या बाहेरील १८५ लोकांनी केली जमीन खरेदी

उत्तरकाशी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली, लोकांचे घाबरून घराबाहेर पलायन

भाजप लक्ष्मणासारखे लोकांचे प्रश्न सोडवतो

हुश्श टेंशन गेलं ईएमआय वाढणार नाही.. रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीला ब्रेक

“महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यात गरीबांसाठी दहा लाख घरे आपण बांधत आहे. शेतकऱ्यांना १ रुपयांत विमा देत आहे. सामान्य माणसाला ५ लाखापर्यंत मोफत आरोग्यसेवा देण्याचं काम, हे आपल्या सरकारने ठरवले आहे. म्हणून समाजात मोठं परिवर्तन करण्याचं काम आपण करत आहोत असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Exit mobile version