उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज,१८ ऑक्टोबर रोजी दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. यावेळी रेल्वे मंत्र्यांसोबत हायस्पीड रेल्वेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई ते सोलापूर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरु करणार असल्याचीही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते म्हणाले, मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ते सुरु करणार आहेत. ज्याचा फायदा सर्वाना होणार आहे. अतिशय कमी वेळात सोलापूर ते मुंबई अंतर पार होणार आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, धारावी पुनर्विकासासाठी त्यांची भेट घेतली आहे. रेल्वेची जागा महाराष्ट्र सरकारला हवी होती, त्यासंदर्भात आमचा पाठपुरावा सुरु होता. आज त्याचा आम्ही करार निश्चित केला आहे. आता ही जागा धारावी पुनर्विकासाकरता महाराष्ट्र सरकारला मिळाली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. गेले २५ वर्ष जे आम्ही स्वप्न पाहत होतो, ते पूर्ण होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेसवे बाळासाहेबांच्या नावाने त्यावर चर्चा झाली. तसेच समृद्धी महामार्गावर भूसंपादन केले त्यावेळी रेल्वेसाठी जागा सोडली होती. या जागेवर आता हायस्पीड रेल्वे सुरु करण्याची सुद्धा चर्चा झाली आहे. या कामासाठी ६८ टक्के जमीन अधिग्रहित असून आणखी ३२ टक्के जमिनीची गरज असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे याचेही काम सुरु करण्यात येणार आहे.
पुणे नाशिक हायस्पीड रेल प्रकल्पाबद्दलसुद्धा चर्चा झाली आहे. मात्र रेल कम रोड यासंदर्भात चर्चा झल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ४७२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मुंबईमध्ये एअर इंडियाची इमारत आहे. ती इमारत महाराष्ट्र सरकारला देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
“वैभव नाईक पैसे जमवणार तर चौकशी होणारच”
पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?
रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
येरवडा कारागृहातील कैदी जगात हुशार
अतिवृष्टीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी झाली तिथे तातडीने आमच्या सरकारने मदत केली, जतनेला वेळेत मदत मिळाली आहे. मात्र आता झालेल्या पावसात ज्या शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाणार आहे.