सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण अलिकडे मी बघतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात”, असं विधान राष्ट्रवादी काँगेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण अलिकडे मी बघतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात. ‘यांना तुरुंगात घालीन, त्यांचा जामीन रद्द करीन. ही काही राजकीय नेत्यांची कामं नाहीत. पण इतकी टोकाची भूमिका काही राजकीय नेत्यांनी घेतली, असे वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकर परिषदेत बोलताना केले होते. त्याला सणसणीत उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे. असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
हे ही वाचा:
सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा
संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी
शिवसेनेच्या सामना मुखपत्रात संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर फडणवीस यांनी एकाच वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही असे थेट उत्तर फडणवीस यांनी दिले आहे.
“