शिवसेनेचे पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांशी संवाद साधताना शिंदेगटाकडे नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं आणि संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंसारखं खणखणीत नाणं आहे अशी टीका केली होती. ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. देशात मोदी यांचं नाणं खणखणीत वाजत आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.
शनिवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी सकाळी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांशी व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंसारखं खणखणीत नाणं आहे. त्यामुळं खचून न जाता निवडणुकांना सामोरं असं भावनिक आवाहन त्यांनी केलं . याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ते मोदीजींचं नाणं दाखवतच जिंकत आले आहेत. त्यामुळे बाळासाहेब नेहमीच श्रध्देय राहतील. देशात मोदी यांचं नाणं खणखणीत वाजत आहे आणि देशात मोदीजींचं नाणं चालतच राहिल, असा ठाम विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की , प्रत्येक निवडणूक शेवटची निवडणूक म्हणून लढा असं मी मागे म्हटलं होतं त्याचं त्यांना फारच वाईट वाटलं होतं.त्यांनी माझीच निवडणूक शेवटची ठरवली होती पण ठिक आहे. मला त्यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही. ज्याला जशी निवडणूक लढवायची आहे त्यांनी ती तशी लढवावी.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
उद्धव ठाकरे यांनी हे वादळ नाही वावटळ आहे असं विधान केलं आहे त्यावर प्रतिक्रिया देतांना फडणवीस म्हणाले की, वादळ आहे की वावटळ आहे हे कोणी किती पाहलीयेत. माझा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. आमचा पक्ष देशात काम करत आहे, जनतेला सेवा देत आहे, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी अधिक बोलणे टाळले. भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या शिबिरा बद्दल बोलताना भारतीय जनता पक्षाचा आचार विचार, आतापर्यंतची कार्यपद्धती व भविष्यातील वाटचाल याची एकूणच चर्चा यामध्ये झाली असं ते म्हणाले.
निवडणुकीचा रोड मॅप तयार
मोदी यांनी देशात गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आहे. गरिबाला जे आपल्या लोकशाहीशी जोडलेले आहे आणि सरकारी विकासाच्या तंत्राशी जोडलेला आहे त्या संदर्भातल्या विषयांवर देखील चर्चा झाली आणि अर्थातच पुढच्या निवडणुकीचा रोड मॅप देखील आम्ही तयार केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.