मंदिर वही बनायेंगे असा नारा आम्ही दिला होता तो पूर्ण होताना बघतोय याचा आनंद होत आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या रामजन्मभूमी आंदोलनातील आठवणी जागवल्या. अयोध्येतल्या रामजन्मभूमीवरील वादग्रस्त बाबरी मशिद हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाने रामजन्मभूमी आंदोलन छेडले होते. अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मनापासून ईच्छा असलेला देशातील प्रत्येक हिंदू नागरिक या आंदोलनात सहभागी झाला होता. अयोध्येतील राम मंदिरासाठी राबवण्यात आलेल्या कारसेवेमध्ये अनेक जण सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार सेवेत सक्रिय होते. त्यामुळे राम मंदिर उभारणीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांना कार सेवेच्या आठवणी जागवल्याशिवाय राहवले नाही .
राम मंदिरात फिरतांना कर सेवेतील तो सर्व काळ डोळ्यासमोरून जातान बघतोय. मंदिर वही बनायेंगेचा दिलेला नारा आज पूर्ण होताना बघत आहे याचा आनंद अवर्णीय असा आहे. कारसेवक म्हणून काम करताना एक जोश होता. एक कमिटमेंट होती. त्याच्यानंतर बराच काळ लोटला. त्यामुळे आपल्या हयातीमध्ये हे मंदिर बघायला मिळणार की नाही असे लोकांना वाटायला लागले होते. पण आता ते बघायला मिळत आहे याबाबद्दल मोदीजींना खूप धन्यवाद दिले पाहिजे.. हे सांगताना फडणवीस यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लेकरं दिसत होती.
रामलल्लाचे दर्शन होणं आहे ही आज आनंदाची गोष्ट आहे. दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा योग्य जुळून आला. त्यामुळेच आज मी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येथे उपस्थित झालॊ आहे. आज आमची सेंट्रल इलेक्शन कमिटीची बैठकही होती. तरी देखील मी विचार केला दर्शन घेऊया आणि मगच दिल्लीला जाऊया. कारण मी राम जन्मभूमी आंदोलनाशी जोडल्या गेलेलो आहे. सर्व कारसेवना मी उपस्थित होतो .या भूमीशी माझ्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे रामलल्लाचे घेता आले आनंद वाटत आहे. असहा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या
हे ही वाचा:
रावण राज्य गेलं आणि रामावर भक्ती असणाऱ्यांचं सरकार आलं आहे!
भारतातील वाघांची संख्या वाढली, आता ३१६७ वाघ
सोन्याच्या आयात ३०टक्क्यांनी घसरली पण चांदीची ६६ टक्क्यांनी वाढली
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागून प्रकरण संपवायला हवं होतं!
राम राज्याची संकल्पना राबवायची तर प्रभू रामाचे दर्शन घेतलेच पाहिजे
सत्ताधारी रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले अशी टीका विरोधकांनी केली होती. त्याबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले, टीका करणे त्यांचे कामच आहे. त्यांना कदाचित आस्था नसेल आम्हला आस्था आहे. प्रभू श्रीराम हे असे व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा हे आपल्याला सांगितले. गांधीजींची काय संकल्पना होती राम राज्याची संकल्पना होती. त्यामुळे राज्याची संकल्पना राबवायची असेल तर प्रभू रामाचे दर्शन घेतलेच पाहिजे.
हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, हे हिंदू राष्ट्रच
स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदूराष्ट्र ही भूमिका आम्हाला मान्य नाही अशी टीका शरद पवार यांनी केली होती. त्यालाही फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ते काय म्हणतात मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. आम्हाला मान्य आहे आणि आमचं हे म्हणणं आहे, की शेवटी भारतात बहुसंख्य हिंदू राहतात त्यामुळे तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, हे हिंदू राष्ट्रच आहे. असे फडणवीस यांनी ठणकावत सांगितले.