25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Google News Follow

Related

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला कर्नाटक सरकारचे कायदामंत्री मधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी, अशी मागणी करतानाच मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात असा दावा तेथील विधान परिषदेत केला आहे. कर्नाटकच्या कायदे मंत्र्यानी केलेल्या या विधानाचे हिवाळी अधिवेशनात जोरदार पडसाद उमटले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उचलून धरला. अजित पवार म्हणाले, कर्नाटक सरकारचे कायदामंत्री मधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करावी, अशी मागणी त्यांच्या विधिमंडळात केली. तसंच मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक राहतात असा जावईशोधही लावला. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकचीच आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्रात कन्नड माणसं नाहीत का? तर महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. सीमाप्रश्नाला अशाप्रकारे चुकीचं वळण देण्याचं आणि सीमावासीयांच्या भावना दुखावण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे. असेही अजित पवार म्हणाले.

माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी या दोन्ही वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध करावा. कर्नाटक सरकार वारंवार असे वक्तव्य करत आहे. तसंच कर्नाटक असं वारंवार करत आहे हे केंद्र सरकारपर्यंत पोहचवावं. कारण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेऊन काही गोष्टी ठरवल्या होत्या याकडे अजित पवार यांनी सभागृहाचे लक्ष्य वेधले.

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय अत्यंत महत्वाचा आहे. कारण यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बैठक झाली. त्यावेळी दोन्ही राज्यांनी नव्याने दावे केले जाणार नाही हे मान्य केले होते. आपणही कालचा ठराव करतांना आपला दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्या दाव्यानुसारच कल ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील मंत्र्यांनी किंवा तेथील आमदारांनी किंवा तेथील काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील जे दावे आज केलेले आहेत ते या बैठकीशी पूर्णपणे विसंगत आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो असे फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

निषेधाचे पत्र पाठवू

मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तशा प्रकारचं निषेधाचं पत्र आम्ही त्यांना पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन करणं दोन राज्यांमधील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना अतिशय कडक शब्दांत सांगण्यात येईल असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे अशी विनंतीही करण्यात येईल. मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही,” असं फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितलं

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा