मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले

भारतीय जनता पक्षाने मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये एक नवा इतिहास रचला आहे आतापर्यन्तचे सर्व रेकॉर्ड तोडून १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. प्रत्याशित पण अपेक्षित विजय भाजपला मिळाला आहे. गुजरातच्या जनतेने मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलेला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भरती जनता पक्षाला मिळालेल्या सर्वाधिक जागांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की ,२७ वर्षानंतर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरी गेली. २७ वर्ष राज्य केल्यानंतर अँटी इइन्कबंसी होईल असे विरोधीपक्ष मानत होते. पण ही प्रो – इन्कबन्सी होती असे निकालांवरून दिसते. गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर विश्वास दाखवला आहे.

भारतीय जनता पक्षाला ५२ टक्के मतं मिळालेली आहे. मतदानाचा आतापर्यंतचा कल बघता कमी अधिक प्रमाणात ज्या जागा आल्या आहेत १५७ जागी भाजप जिंकलाय किंवा पुढे आहे असे चित्र आहे. काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसला आतापर्यंतच्या सर्वात कमी १६ जागा मिळाल्या आहेत. ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडून येणार असे लिहून दिले होते, अशा आप नावाच्या पार्टीचे पुरते बारा वाजले आहेत. जनतेने त्यांना पूर्ण नाकारलेले आहे. त्यामुळे आप पार्टी दिल्लीपुरती मर्यादित आहे हे पुन्हा एकदा गुजरातने दाखवून दिले आहे. गुजरातमधील परिवर्तन मोदी आणि भाजपने केले हे त्यांना समजले. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातमधील जनतेने दाखवला आहे. गुजरातच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा :

काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव

आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका

भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी

…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली

मी गुजरातमध्ये प्रचाराला गेलो होतो त्यावेळी जनतेचा मूड अगदी स्पष्ट दिसत हित. गुजरात मोदीमय, भाजपमय झाले होते. जनतेने मूड बनवलेला होता. जिथे जिथे सभा घेतल्या तेथे मोदी यांचे नाव घेतल्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया यायच्या त्यावरून लोकांची मानसिकता काय होती हे दिसून येते. फडणवीस यांनी गुजरातमध्ये मिळालेल्या विजयबद्दल पंतप्रधान मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील, गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातची जनता यांचे आभार मानले.

Exit mobile version