महाराष्ट्र कोणासोबत हे ग्रामपंचायत निवडणुकीने दाखवून दिले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र कोणासोबत हे ग्रामपंचायत निवडणुकीने दाखवून दिले

ग्राम पंचायत निवडणुकीत भाजप व शिंदे गटाच्या सरकारवर जनतेनं विश्वास दाखवला आहे. २३९ जागा जिकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कोणासोबत हे ग्रापंचायत निवडणुकांवरून सिद्ध झाले आहे असेही फडणवीस म्हणाले आहे.

राज्यातील १८जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील१ हजार १६६ ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकांचे निकाल संध्याकाळी जाहीर झाले. त्यावेळी भाजप ३९७, शिंदे गट ८१ आणि ठाकरे गट ८७ जागांवर विजयी झाले आहेत.

महाराष्ट्र कोणासोबत हे ग्रामपंचायत निवडणुकांवरून सिद्ध झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालातून विरोधकांना उत्तर मिळाले आहे,  असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले की, ३९७ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

हे ही वाचा

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

पोट निवडणूक लढवावी असे कार्यकर्त्यांचे मत होते. माघार घेतल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत हे खरे आहे. माघार घेण्यासाठी काहींनी समोरून विनंती केली तर काहींनी मागून विनंती केली असा टोलाही फडणवीस यांनी लगावला .
ग्रामपंचायत आम्ही जिंकलो आहोत. मविआच्या सर्व आकडेवारीनुसार आम्ही दुपटीने पुढे आहोत. आम्ही हवेत दावे करत नाही. आमची युती मविआ पेक्षा पुढे आहे, असे सांगून फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत.

Exit mobile version