सोमवारी महाराष्ट्राच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधकांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करण्यावर एकमत झाले. ही चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खडाजंगी झाल्याचे बघायला मिळाले. भास्कर जाधव यांनी पॉईंट ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’ मांडू देत नाहीत या मुद्द्यावरून मुद्दा मांडू देत नसल्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली. त्यावर फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला. भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात असा सवाल केला. अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही अशी कडक भूमिका घेतली.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार? यावर चर्चा उपस्थित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही. हे काय चालले आहे असा प्रश्न करत आक्रमक सभागृहात आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला.
हे ही वाचा:
‘वंदे भारत’ वर पुन्हा फेकले दगड
संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क
मरीन ड्राइव्ह वरून वरळीला जा अवघ्या आठ मिनिटांत , तेही टोलशिवाय.
होळी रे होळी, नियमांची गोळी! अश्लील गाणे, टोमणे व रंगीत पाणी शिंपडलेत तर याद राखा
“भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही. हे खपवून घेणार नाही असे सभागृहात ठणकावून सांगितले. फडणवीस म्हणाले, सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल,” असं सांगत विधाबसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले.
‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही करावी’ यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांना शिष्टमंडळ भेटून त्यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याबाबत विनंती करणार आहे या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला आश्वासित केलं.