27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणश्रेय घेणाऱ्या मविआला चिमटा, एखाद्याला पोरगा झाला तरी तुमच्यामुळेच झाला म्हणाल!

श्रेय घेणाऱ्या मविआला चिमटा, एखाद्याला पोरगा झाला तरी तुमच्यामुळेच झाला म्हणाल!

विकासकामांच्या श्रेयावरून देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार हल्लाबोल

Google News Follow

Related

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात विकास कामांचा धडाका सुरु आहे. त्याचा धसका विकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यात कोणत्याही नवीन विकासकामांची पूर्तता झाल्यानंतर त्याचे श्रेय बळकावणे एवढेच उद्धव ठाकरे यांच्या हातात उरले आहे. या श्रेयवादावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, अस जोरदार टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे.

मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी म्हणतात, ५२ वर्षांचा झालो पण आजही मला घर नाही!

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारले होते क्रांतिचे मंदिर; अभिनव भारत मंदिर

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

मुले जन्माला घाला, म्हणत चीनमध्ये नवविवाहितांना नवनव्या ऑफर

एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी  जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. महा विकास आघाडीवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय मला एक गोष्ट समजलीच नाही. आपण कोणतंही काम सुरू केलं तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं. अरे अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर ते घरातच होते. दरवाज्याच्या आतच होते. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली? असा उपरोधिक सवालही फडणवीस यांनी यावेळी केला.

 म्हणून ही मुंबईची अवस्था

कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात. काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अवस्था झालीय, असा जोरदार हल्लाबोल फडणवीस यांनी यावेळी बोलतांना केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा