शिंदे -फडणवीस सरकारचा सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखात्याचाही कार्यभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणूनही फडणवीस यांचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. विधानपरिषदेत मंत्री दीपक केसरकर राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींना मोठी भेट दिली आहे. फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये देण्याची पहिली घोषणा केली. त्याचबरोबर राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३००० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे.
फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुंबई, अमरावती, नाशिक, संभाजी नगर, नागपूरमध्ये सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याच बरोबर शिवाजी महाराजांची जीवन गाथा प्रसिद्ध केली जाईल तसेच शिवनेरीवर महाराजांच्या जीवन चरित्रावर संग्राहालय उभारण्यात येईल असे जाहीर केले.
जलयुक्त शिवार योजना – २ पुन्हा राबवणार
अल् निनोमुळे मान्सूनचा पाऊस कमी होण्याचा अंदाज व्यक्त करतांनाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेततळे योजना जाहीर केली होती. या योजनेला राज्यात चांगले यश मिळाले होते. महाविकास आघाडीच्या काळात या योजनेला खीळ बसली . पण आता शेततळे योजनेचा दुसरा भाग आणण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार. मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. घर घर जल योजनेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोकणातील सिंचनासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यात नेणार असल्याचं त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस
राऊतांची तर रोजच होळी, तीच बोंब तीच भांग
विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…
महाराष्ट्रासाठी आणखी काय?
– अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपयांवर.
– गोपीनाथ मुंडे अपघात योजना लागू करणार.
– सेंद्रीय शेतीसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद.
– ८६ हजार पंपांना तात्काळ वीज जोडणी देणार .
– मच्छिमारांसाठी ५ लाख रुपयांच्या विम्याची तरतूद.
– ड्रोन, सॅटीलाइटने आता नुकसानीचे पंचनामे होणार.
– बुलढाण्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद.
– नागपूर आणि नाशिकमधल्या उद्यानासाठी २५० कोटी रुपयांची घोषणा.
– अपघात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दोन लाखापर्यंत सानुग्रह अनुदान
– धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांची केली घोषणा.