सध्या आर्यन खान प्रकरणात एक नवे वळण आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. क्रूझवरील छापा प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलच्या व्हिडीओनंतर आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मते व्हिडीओची सत्यता न पडताळता हे अशापद्धतीने आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. संजय राऊत यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांनं ट्विट करणे हे चुकीचे असल्याचेही यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले.
यातील सर्वात मुख्य बाब म्हणजे व्हिडीओ क्लिपची सत्यता अजूनही पडताळण्यात आलेली नसताना, नेते मात्र ट्विट करू लागले आहेत. व्हिडीओ क्लिपमध्ये सांगितलेल्या गोष्टींची सत्यता पडताळून त्यावर भाष्य करणे योग्य होईल. परंतु कोणतीही सत्यता न पडताळता या अशापद्धतीने ट्विट करणे किंवा अंतिम निकाल देणं, सत्यमेव जयते बोलणं हे खूपच घाईचे आहे असे मत यावेळी दरेकर यांनी व्यक्त केले.
सकाळच्या सुमारास हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांसमोर आल्यावर प्रवीण दरेकर यांनी यावर हे भाष्य केलेले आहे. एनसीबीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. हे जे काही चालले आहे ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालले असल्याचे मत यावेळी दरेकर यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा:
‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’
आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?
झोमॅटोच्या ट्विटने लागली पाकिस्तानला मिरची
आर्यनला अटक झाल्यानंतर जवळपास २२ दिवसांनी समोर आलेल्या व्हिडीओनंतर, संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. तसेच संबंधित प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी करत राऊत यांनी मलिक यांना पाठिंबा दर्शविला आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण देशामध्ये क्रुझवरील ड्रग्ज प्रकरण गाजत आहे.