31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणराज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या वर आहेत, हे नवाब मलिकांना ठाऊक नाही काय?

राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या वर आहेत, हे नवाब मलिकांना ठाऊक नाही काय?

Google News Follow

Related

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून पूरग्रस्तांना भेटणे, त्यांना दिलासा देणे, त्याविषयी माहिती करून घेणे ठाकरे सरकारला बिल्कुल पसंत पडलेले नाही. राज्यपाल हे मुख्यमंत्री नाहीत. त्यांनी हस्तक्षेप करू नये, असे राज्य सरकारच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. ‘राज्यपाल हे मुख्यमंत्री नाहीत, पण राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्याही वर आहेत. घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात हे नवाब मलिक यांना माहीत नाही का?’, असा सवाल दरेकर यांनी केला.

राज्यपाल ५ ऑगस्टपासून नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याच्या रूपरेषेवरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यपालांचे अधिकार काय, हे घटनेत नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून काळजी घेत त्यांनी दौरे केले, राज्याचा आढावा घेतला तर यामध्ये राजकीय वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्याची काळजी घेण्यासाठी आढावा बैठक ते घेऊ शकतात, असेही दरेकर म्हणाले. राज्यपाल नांदेडमधील विद्यापीठाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. नांदेड येथील विद्यापीठ असो किंवा कोणतेही विद्यापीठ हे राज्यपालांच्या अंतर्गत असतात. त्यामुळे विद्यापीठात जाणं, त्या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, यामध्ये काहीच गैर नाही, असेही दरेकर यांनी नमूद केले.

हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला राज्यपालांची टाचणी

गोगरा पॉईंटवर तोडगा निघाला!!!

…म्हणून काँग्रेस नेत्याला केले समर्थकांनीच ट्रोल

सुट्टीवर निघालेल्या जवानावर घातला काळाने घाला

सरकार पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले नाही; पण राज्यपाल पोहोचले

भाजपा नेते ऍड. आशीष शेलार म्हणाले की, ‘रोज काहीतरी बोललंच पाहिजे असा अट्टहास असलेले नेते म्हणजे नवाब मलिक.’ शेलार म्हणाले की, राज्य सरकार पूरग्रस्त भागापर्यंत पोहोचलं नाही, पण राज्यपाल पोहोचले यावर खर तर सरकारला शरम वाटली पाहिजे. पण राज्यपालांवर टीका करून वातावरण निर्मिती करण्यापलीकडे हे काही करत नाहीत. महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे म्हणूनच जनतेला राज्यपालांकडे दाद मागावी लागते हे लक्षात घ्या, असे शेलार म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा