मुस्लिमांच्या बाबतीत आज जे होत आहे तेच १९८०मध्ये दलितांबाबत होत होते!

राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केला दावा

मुस्लिमांच्या बाबतीत आज जे होत आहे तेच १९८०मध्ये दलितांबाबत होत होते!

आपल्या अमेरिका दौऱ्यात मोहोब्बत की दुकान या नावाने सुरू केलेल्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी भारतातील मुस्लिमांच्या बाबतीत आज जे होत आहे, ते १९८०च्या दशकात दलितांच्या बाबतीत होत आहे. मी त्यांना हमी देतो की, शीख, ख्रिश्चन, दलित, आदिवासी हेदेखील असाच अनुभव घेत असतील.

सॅन फ्रॅन्सिस्को येथे सध्या राहुल गांधी दौरा करत असून तिथे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मुस्लिमांना जसे आता असुरक्षित वाटत आहे तसेच शीख, ख्रिश्चन, दलित, आदिवासींनाही वाटत असेल याची मी हमी देऊ शकतो. असेच १९८०च्या दशकात दलितांबाबत होत होते.

राहुल गांधींच्या या विधानाला पाठिंबा भारतात कर्नाटकमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी दिला. त्यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला की, तुम्हाला वाटते का, अल्पसंख्य, दलित, आदिवासी स्वतःला असुरक्षित मानतात? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्य सगळे देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक आहे, असे त्यांना वाटते आहे का?

हे ही वाचा:

बकरीचोर समजून तीन अल्पवयींना मारहाण; एकाचा मृत्यू

‘माझ्या पुतणीचा कुस्तीपटू आंदोलक गैरवापर करत आहेत’

पाद्री, मौलवींचे गणवेश, मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर भुजबळ टीका करतील का?

कांदिवलीतील प्रेमप्रकरणातून हत्या करणाऱ्या प्रयागराज येथून अटक 

राहुल गांधी यांनी या भाषणात म्हटले की, देशात आर्थिक असमानता आहे. जिथे अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला असताना पाच लोकांकडे लाखो करोडो रुपये आहेत. आदिवासी, गरीब, दलित यांच्याप्रति होत असलेली वागणूक पाहिली तर त्यांच्यासाठी भारत ही योग्य जागा नव्हे.

राहुल गांधी हे १० दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यात ते पुढे वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेत नंतर न्यूयॉर्कचाही त्यांचा दौरा आहे. या दरम्यान भारतीयांशी ते संवाद साधत आहेत. तेथील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही ते बातचीत करत आहेत.

Exit mobile version