31 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरराजकारण‘दयनीय भास्कर’; भाजपात आलेल्या अदिती सिंग यांना दाखविले देहविक्रय करणारी महिला

‘दयनीय भास्कर’; भाजपात आलेल्या अदिती सिंग यांना दाखविले देहविक्रय करणारी महिला

Google News Follow

Related

भाजपाच्या विरोधापायी कोणत्या थराला जातो आहोत, याचे भान आजकाल हरवत चालले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील आघाडीच्या दैनिक भास्करने तर काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या अदिती सिंग यांचे छायाचित्र गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात देहविक्रय करणाऱ्या स्त्रीची भूमिका करणाऱ्या आलिया भटच्या चेहऱ्याच्या जागी लावण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. त्यावरून प्रचंड टीका होत आहे.

दैनिक भास्करने या ट्विटमध्ये अदिती सिंग यांचे छायाचित्र आलिया भटच्या चेहऱ्याच्या ठिकाणी लावून ‘आज ता चुनावी पोस्टर’ : वसुली बाई रायबरेली बाडी का भौकाल अशी जाहिरात करण्यात आली.

आलिया भटचा अभिनय असलेला चित्रपट गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित होत आहे. त्याचा आधार या ट्विटमध्ये घेण्यात आला. या चित्रपटात आलियाने एका देहविक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका केली आहे.

दैनिक भास्करने काँग्रेसचे नेते किशोरी लाल शर्मा यांच्या मुलाखतीसोबत हे ट्विट टाकले. शर्मा यांनी या मुलाखतीत म्हटले होते की, जर भाजपा सरकार बनविण्यात अपयशी ठरले तर अदिती सिंग आणखी कोणत्या तरी पक्षात जातील. अदिती सिंग यांचा पक्षीय विचारधारेशी संबंध नाही.

हे ही वाचा:

सिंगापूर एअर शो मध्ये ‘तेजस’ घेणार भरारी

धक्कादायक! मोदीविरोधक पत्रकार राणा अय्युबने पीएम केअरला दिली देणगी

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त

 

अदिती सिंग यांनी नुकताच रायबरेलीमधून आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या भाजपामध्ये दाखल झाल्या. दैनिक भास्करने केलेल्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. एका महिलेची देहविक्रय करणाऱ्या महिलेशी तुलना केल्याबद्दल लोकांनी दैनिक भास्करला धारेवर धरले. दैनिक भास्करसारख्यांनी किती खाली घसरावे याला काही मर्यादा आहेत, असे एका नेटिझनने म्हटले आहे.

दरम्यान, दैनिक भास्करने हे ट्विट हटविले पण तोपर्यंत ते सगळ्यांपर्यंत पोहोचले होते. अदिती सिंग यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दैनिक भास्करवर टीका केली आणि आपण अशा ट्विटमुळे थांबणार नाही, असा इशाराही दैनिक भास्करला दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा