शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात ठाकरे कनेक्शन?.. युवा सेनेचे कार्यकर्ते साईनाथ दुर्गे ताब्यात

मातोश्री फेसबुक पेज आणि साईनाथ दुर्गे यांचा काय संबंध याचा आता पोलीस घेत आहेत शोध

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात ठाकरे कनेक्शन?.. युवा सेनेचे कार्यकर्ते साईनाथ दुर्गे ताब्यात

शीतल म्हात्रे व्हिडिओ मॉर्फिंग प्रकरणी ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गे याला दहिसर पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. साईनाथ दुर्गे हा युवा सेनेच्या कार्यकारणीचा सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल मात्रे यांच्या व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओवरून राज्यात खूप मोठा वाद पेटलेला आहे. साईनाथ दुर्गे याला ताब्यात घेतल्यानंतर आता या सर्व प्रकरणाच्या संशयाची सुई ठाकरे गटाकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दहिसर पोलिसांनी दुर्गे याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे दहिसरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील व्हीडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता.

भूमिपूजन, उद्घाटन, रॅली आणि भाषण असा एकूण ४.३० तासांचा हा कार्यक्रम होता. या रॅलीचा व्हिडिओ मॉर्फ करून तो आपल्या सोयीने मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले होता. त्यामुळे राज्यात संतप्त संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा व्हीडिओ ठाकरे गटाच्या अनेक फेसूबक पेजवरुन शेअर करण्यात आल्याचा थेट आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता. भाजपचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचा आरोप राज सुर्वे यांनी केला होता.

विधिमंडळातही जोरदार पडसाद

विधिमंडळातही या सर्व घटनेचे सोमवारी जोरदार पडसाद उमटलेले बघायला मिळाले होते. महिला आमदार यामिनी जाधव, मनिषा चौधरी आणि भारती लव्हेकर यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा जोरदार उचलून धरला. शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा व्हि़डिओ मॉर्फिंग प्रकरणात नेमकं कोण जबाबदार आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करा, यासाठी एसआयटी नेमा अशी मागणी आज विधानसभेत करण्यात आली.

हेही वाचा :

सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

साईनाथ दुर्गे हे युवा सेनेच्या कोर कमिटीचे सदस्य म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचे सांगण्यात येत आहे. आहे. मातोश्री फेसबुक पेज आणि साईनाथ दुर्गे यांचा काय संबंध याचा आता पोलीस शोध घेत आहेत

Exit mobile version