कर्नाटकमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसने दणदणीत यश मिळविले पण आता तो आनंद बाजूला ठेवून नव्या आव्हानांना त्यांना सामोरे जायचे असल्याचे दिसते आहे. दिल्लीत कर्नाटकमधील काँग्रेसच्या नव्या मुख्यमंत्र्यासाठी बैठक झाली पण त्यासाठी शर्यतीत असलेले डी. के. शिवकुमार त्या बैठकीला गेलेच नाहीत. पोटदुखीने ते बेजार असल्याचे कळले. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला वाव मिळाला.
सध्या चर्चा आहे ती कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची आणि त्यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा आहे. दिल्लीत त्यासाठी बैठक झाली पण आपण पोटदुखीने बेजार असून या बैठकीसाठी जाणार नाही, असे त्यांनी घोषित केले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांनाही त्या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. पण शिवकुमार यांनी जायचे टाळले. काँग्रेसचे १३५ आमदार आहेत. माझ्यासोबत एकही आमदार नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडत आहोत, असे सांगून त्यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत.
त्याआधी प्रारंभी शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, आपण एक खासगी कार्यक्रम आटोपून मग दिल्लीला जाणार आहोत. आमच्या पक्षश्रेष्ठींनी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मला दिल्लीला बोलावले आहे. मला थोडा उशीर झाला आहे पण मिळेल त्या विमानाने मी दिल्लीला जाणार आहे.
हे ही वाचा:
समीर वानखेडे यांनी २५ कोटी उकळण्याचा कट रचला होता!
न्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त
कर्नाटकचा मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्ष खरगे ठरवणार
मागणी केली म्हणून तडकाफडकी निर्णय नाही !
याच पत्रकार परिषदेत शिवकुमार यांनी कर्नाटकात आपण कशी कामगिरी केली हेदेखील सांगितले. काल १३५ आमदारांनी आपले मुख्यमंत्रीपदाबाबतचे मत कळविले आणि एका ओळीतील ठराव संमत केला. काहीजणांनी आपली वैयक्तिक मतेही कळविली. १३५ आमदार ही माझी शक्ती आहे. माझ्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १३५ आमदार जिंकून आणले आहेत. एक माणूस हिंमत दाखवेल तर बहुमत खेचून आणू शकतो. गेल्या पाच वर्षात काय झाले याविषयी मी काही बोलू इच्छित नाही. कर्नाटकातील काँग्रेससाठी सर्वकाही देण्याचा आपला प्रयत्न असेल.