छत्तीसगड येथील धर्मसंसदेत केलेल्या भाषणानंतर कालिचरण महाराज यांच्याविरोधात काहीठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पण यासंदर्भात महाविकास आघाडीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालिचरण महाराजांना ठेचून काढा अशी भाषा केली आहे.
आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा कालिचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे. कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि या ऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करतो. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा हा सनातनी आहे निवडणुकीला उभा राहिला २४७ मते मिळाली.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकाही होत आहे. एका मंत्र्याने अशी भाषा करणे योग्य आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
हा कलीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे
कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि याऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करततो
अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा
हा सनातनी आहे
निवडणुकीला उभा राहिला 247 मत्त मिळाली pic.twitter.com/Xybsp97kyk— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 27, 2021
मुंबईत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी सदस्यांनी शिस्तीच्या पालनाबद्दल चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगुंटीवार यांनी सदस्यांच्या वागणुकीबद्दल आपली मते व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या या वक्तव्यांकडे पाहिले जात आहे.
हे ही वाचा:
चीनने लाखो नागरिकांना लोटले लॉकडाऊनमध्ये
कालीचरण महाराज म्हणतात, फाशी दिलीत तरी चालेल
काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी पोलिसांच्या ताब्यात
नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव करून खिल्ली उडविली होती. त्यावरून नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी नितेश राणे यांना डिवचण्यासाठी कोंबडी आणि मांजरापासून तयार केलेले चित्र ट्विट केले होते. त्यावर नितेश राणे यांनीही डुकराचे चित्र शेअर करत मलिक यांना प्रत्युत्तर दिले होते. या सगळ्या प्रकाराची चर्चा विधिमंडळात मंगळवारी झाली. त्यात आता आव्हाड यांनी ठेचण्याची भाषा केल्यामुळे सदस्यांच्या शिस्तीचा, वागणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.