भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षेत कुचराई झाल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे. एक दिवसापूर्वी पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुरक्षेतील त्रुटींची तक्रार केली होती. आता याबाबत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) उत्तर आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा खुद्द राहुल गांधींनीच भंग केली असल्याचे सीआरपीएफने म्हटले आहे. राहुलला वेळोवेळी या सुरक्षेच्या उल्लंघनांची माहिती देण्यात आली आहे.
२४ डिसेंबर रोजी भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचल्यानंतर बऱ्याचवेळा सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाले. यात्रेदरम्यान वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आणि झेड प्लस सुरक्षा असलेल्या राहुल गांधींभोवती सुरक्षा घेरा राखण्यात दिल्ली पोलिसांना अनेक वेळा अपयश आले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, राहुल गांधींसोबत चालणारे लोक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्याभोवती गराडा घातलेला दिसतो. यावेळी दिल्ली पोलीस मूक प्रेक्षक बनतात असे काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार राहुलच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की जेव्हा जेव्हा सुरक्षा असलेल्या एखाद्या व्यक्तीचा दौरा असतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या सुरक्षेची तयारी सीआरपीएफ राज्य पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने करते. सीआरपीएफने २४ डिसेंबरलाच दिल्लीतील भारत जोडो यात्रेची तयारी केली होती. सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले आणि दिल्ली पोलिसांनी आवश्यक बळ पुरवले असे सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांनी ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले
२०२० पासून राहुल गांधींनी ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे सीआरपीएफने म्हटले आहे. याबाबत त्यांना प्रत्येक वेळी माहिती देण्यात आली. भारत जोडो यात्रेच्या दिल्ली टप्प्यातही, त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सीआरपीएफच्या म्हटले आहे.