कथित माहिती अधिकार कार्यकर्ता जाणीव तृणमूल काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता साकेत गोखले हा कायमच नको त्या कारणांसाठी चर्चेत असतो. सध्या समाज माध्यमानावर पुन्हा एकदा साकेत गोखले चर्चेत आला आहे आणि ते देखील लोकांकडून संशयास्पदरित्या देणग्या गोळा केल्यामुळे!
दहा रुपयाचा माहिती अधिकार वापरण्याचे काम पूर्ण वेळ करता यावे यासाठी क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म वापरून साकेत गोखले याने निधी उभा केला होता. पण आता अचानक हा क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म गायब झाला आहे. ourdemocracy.in असे या प्लॅटफॉर्मचे नाव होते. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात साकेत गोखले याने या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मची लिंक आपल्या ट्विटर खात्यावर टाकली होती. तर लोकांनी या ट्विटर लिंक वर जाऊन आपल्याला पैसे पुरवावेत असे गोखले याने म्हटले होते.
हे ही वाचा:
…म्हणून गुंड सुरेश पुजारीला हवा होता फिलिपिन्समध्ये आश्रय
सांगली जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव वगळले
जावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब
… हे आहे बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेमागचे खरे कारण
नोव्हेंबर २०१९ मध्ये आवाहन केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात साकेत गोखलेने २२ लाखांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली होती. त्याने स्वतः ट्विटरद्वारे याची कबुली दिली होती. या पैशातून तो त्याचे आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्यांचे दैनंदिन खर्च भागवत असल्याचे त्याने म्हटले होते. तर ही वेबसाईट पूर्णपणे पारदर्शक असून त्यावर सर्व हिशोब पाहता येऊ शकतात असे साकेत गोखलेने म्हटले होते.
साकेत गोखले आधी याच वेबसाईटचा वापर तत्कालीन कम्युनिस्ट नेता आणि सध्याचा काँग्रेस पक्षाचा सदस्य असलेल्या कन्हैया कुमार याने केला होता. तर आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी मारलेना यांनी देखील हा क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म वापरला होता. तर या व्यतिरिक्त जिग्नेश मेवाणी, शाहेला रशीद, मनिष सिसोदिया यांनी देखील हा प्लॅटफॉर्म वापरला आहे. पण हा प्लॅटफॉर्म असा संशयास्पदरित्या कसा गायब झाला हे मात्र अद्यापही समोर आलेले नाही.