आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पानंतर मविआ सरकारने टाटा एअरबसबद्दल जबाबदारी झटकली

आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर

आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देण्यासाठी भारतीय हवाई दलाचे सी-295 वाहतूक विमान आता भारतात बनवले जाणार आहे. या प्रकल्पासाठी युरोपची एअरबस कंपनी आणि भारताची टाटा यांनी हातमिळवणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, ३० ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, या प्रकल्पावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापले असून, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेला याचे खापर शिंदे फडणवीस सरकारवर फोडले जातं आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, भारताने ५६ सी -295 मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा तसेच हवाई दलाच्या जुन्या Avro-748 विमानाने बदलण्यासाठी एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत २१ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. करारानुसार, एअरबस चार वर्षांच्या आत सेव्हिल, स्पेन येथील अंतिम असेंब्ली लाइनवरून भारताला उड्डाण स्थितीत पहिली सोळा विमाने वितरित करणार आहे. त्यानंतर टाटा भारतात ४० विमाने तयार करणार आहे. हा करार दोन कंपन्यांमधील औद्योगिक भागीदारीचा भाग आहे. खाजगी कंपनीने भारतात बनवलेले हे पहिले लष्करी विमान असेल. या प्रकल्पासाठी एकूण २१ हजार ९३५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

हे ही वाचा:

अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक

दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन बहिणींना मुंबईतून अटक

आईच्या कुशीतून पळवलेल्या ३ महिन्याच्या चिमुरडीची दाम्पत्याच्या तावडीतून सुटका

एअरबस- टाटा प्रकल्प हा महाराष्टरमध्ये सुरु करण्यात येणार होता, अशी चर्चा सुरु होती. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरु होणार होता अशी माहिती होती. मात्र, सध्या हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरु होणार असल्याची घोषणा देशाचे संरक्षण सचिव अजयकुमार यांनी केली आहे. मात्र, हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याने राजकीय वर्तुळात शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली जातं आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ एअरबस- टाटा हा प्रकल्प देखील महाराष्ट्राच्या हातून गेल्याचे खापर आता शिदे-फडणीस सरकारवर फोडले जातं आहे.

Exit mobile version